पुणे:“स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ” या ऐतिहासिक स्थळाच्या विकासासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी मान्यता देण्यात आली आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षात या स्थळाच्या विकासासाठी रु. 30.00 कोटी इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सदर प्रस्तावनुसार:
प्रारंभिक प्रकल्प आराखड्याच्या अंतर्गत, रु. 269.24 कोटींच्या निधीस मान्यता देण्यात आलेली होती. तथापि, वस्तू व सेवा करात 6% वाढ झाल्यामुळे, 23.07.2024 रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार, रु. 282.2425 कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता देण्यात आली आहे.
प्रस्तावित आराखड्यातील कामे आणि निधीचे वितरण असे आहे:
स्मारक परिसर: रु. 12.00 कोटी
घाट बांधकाम: रु. 6.00 कोटी
संग्रहालय, प्रेक्षागृह, प्रकाश आणि ध्वनी यंत्रणा: रु. 3.00 कोटी
पायाभूत सुविधा: रु. 5.00 कोटी
अस्थित्वातील समाधीचा जीर्णोद्धार: रु. 1.85 कोटी
भूसंपादन: रु. 2.15 कोटी
एकूण: रु. 30.00 कोटी
या निधीचा वापर करतांना संबंधित उपयोजकांनी ताळमेळ ठेवून कागदपत्रांची अचूकता सुनिश्चित करणे आवश्यक आहे. मान्यताप्राप्त खर्चाचे प्रमाणपत्र वेळोवेळी सादर करणे गरजेचे आहे.
सदर प्रस्तावानुसार लवकरच प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल आणि आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये याचा कार्यान्वय होईल.
या निर्णयामुळे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ अधिक विकसित होईल आणि त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी योग्य ठिकाण प्राप्त होईल.
תגובות