top of page
newsbre.jpg
Writer's pictureYCONE

सिंधुदुर्ग मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या नुकसानीची संयुक्त समिती चौकशी करणार.


29 ऑगस्ट 2024 PIB : संरक्षण मंत्रालय सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुर्देवाने खराब हवामानामुळे झालेल्या नुकसानाची चौकशी करण्यासाठी भारतीय नौदलाच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त तांत्रिक समिती स्थापन करण्यात येत असून त्यात महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी आणि तांत्रिक तज्ञांचा समावेश आहे.

मराठा नौदल आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सागरी संरक्षण आणि सुरक्षेचा वारसा आणि आधुनिक भारतीय नौदलाबरोबर त्याचे ऐतिहासिक नाते यांचा गौरव करण्याच्या उद्देशाने, सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित नौदल दिनाच्या समारंभाचा भाग म्हणून 4 डिसेंबर 23 रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते. राज्य सरकारच्या समन्वयाने भारतीय नौदलाने या प्रकल्पाची संकल्पना तयार केली होती आणि त्यासाठी राज्य सरकारने निधीही उपलब्ध करून दिला होता.

पुतळा लवकरात लवकर दुरुस्त करण्यासाठी आणि पुनर्स्थापित करण्याच्या  सर्व उपाययोजनांमध्ये मदत करण्यासाठी भारतीय नौदल वचनबद्ध आहे.



26 views0 comments

Commenti


bottom of page