मुंबई, दि. ९: महाराष्ट्रातील 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे ज्येष्ठ नागरिकांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत भारतातील 73 व महाराष्ट्रातील 66 तीर्थक्षेत्रांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थक्षेत्र यात्रा मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाकडे अर्ज सादर करण्याचे आवाहन सामाजिक न्याय विभागाने केले आहे.
योजनेचे लाभ स्वरूप:
या योजनेंतर्गत जिल्हानिहाय निश्चित केलेल्या कोट्याच्या आधारे लॉटरी पद्धतीने निवड झालेल्या पात्र व्यक्तीला निर्धारित तीर्थ स्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेसाठी योजनेचा लाभ मिळवता येईल. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास इत्यादी सर्व बाबींचा समावेश आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रती व्यक्ती रूपये 30,000 इतकी आहे.
पात्रतेचे निकष:
लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
वय वर्षे 60 व त्यावरील व्यक्ती योजनेचा लाभ घेऊ शकतात.
लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रूपये 2 लाख 50 हजारापेक्षा जास्त नसावे.
कुटुंबातील सदस्य आयकरदाता नसावा.
कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत असू नये किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत असू नये.
चारचाकी वाहने (ट्रॅक्टर वगळता) कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत नसावे.
लाभार्थी प्रवासासाठी शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा.
योजनेच्या अधिक माहितीसाठी अर्जदारांनी संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण विभाग, सामाजिक न्याय भवन येथे संपर्क साधावा.
अधिक वाचा:
YCONEवर तुम्हाला मिळेल देश-विदेशातील धम्माल राजकीय आणि आर्थिक बातम्या! लाइव्ह अपडेट्स, खास स्टोरीज आणि विश्लेषणासाठी आमच्या बातम्या सेक्शनला भेट द्या.
आजच सब्सक्राइब करा आणि शेअर करा: तुम्हाला आवडणाऱ्या बातम्यांवर चर्चा करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आमची वेबसाइट इतर वेबसाइट्सपेक्षा वेगळी आहे कारण आम्ही तुम्हाला सखोल विश्लेषण आणि तथ्यपूर्ण माहिती देतो.
राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्यांसाठी आमच्या वेबसाइटला नियमितपणे भेट द्या आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या न्यूजलेटरसाठी सब्सक्राइब करा.
Comments