top of page
newsbre.jpg
Writer's pictureYCONE

महानगर परिवहन महामंडळाच्या ५००० बसेसचा नैसर्गिक वायू इंधनात रुपांतरण: ९७० कोटींचा निधी मंजूर.


मुंबई 26 ऑगस्ट : नवीन हरित क्रांतीचा प्रारंभ: ५००० बसेसचा नैसर्गिक वायू इंधनात रुपांतरण!

प्रत्येक बस रु. १९.४० लाख प्रमाणे ५००० वाहनांसाठी एकूण रु. ९७० कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला आहे.


सन 2023-2024 या वर्षाच्या अर्थ संकल्पीय भाषणावेळी तत्कालीन मा.उप मुख्यमंत्री (वित्त) यांनी

हरित परिवहन या बाबी अंतर्गत- “5 हजार डिझेल बसेसचे द्रवरुप नैसर्गिक वायू इंधना वरील वाहनांमध्ये रूपांतरित करण्यात येईल असे जाहीर केले होते .उपमुख्यमंत्री (वित्त) यांनी जाहीर केलेल्या महत्वाकांक्षी प्रकल्पाअंतर्गत, महाराष्ट्र राज्यातील ५००० बसेसना द्रवरुप नैसर्गिक वायू (LNG) इंधनावर चालवण्यात येणार आहे.




त्यानुसार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या रा. २२.११.२०२३ रोजी झालेल्या ३०३ व्या बैठकीमध्ये महामंडळ ठिाव क्र. 2023:11:06 रा. 22.11.2023 अन्वये ५०००  डिझेल इंधनावरील वाहनांचे द्रवरुप नैसर्गिक वायू (LNG) या पर्यायी इंधनावरील वाहनांमध्ये रुपांतरण करण्याबाबत स्त्रोत रणनिती करून, प्रत्येक बस रु. १९.४० लाख प्रमाणे ५००० वाहनांसाठी एकूण रु. ९७० कोटी निधी महाराष्ट्र शासनाकडे मंजूरीसाठी सादर करण्यात आला.


या प्रकल्पाच्या यशस्वी कार्यान्वयनासाठी महाराष्ट्र शासनाने ९७० कोटींचा निधी मंजूर केला आहे. यामुळे, फक्त २०२४-२५ पर्यंतच नव्हे, तर पुढील चार आर्थिक वर्षांत रस्त्यांवर वायू-आधारित बसेस दिसतील.

प्रकल्पाची रक्कम:

  • २०२४-२५: रु. ४० कोटी

  • २०२५-२६: रु. २०० कोटी

  • २०२६-२७: रु. ३७० कोटी

  • २०२७-२८: रु. ३६० कोटी


या निधीच्या मदतीने प्रत्येक बसची रुपांतरण प्रक्रिया सुलभ होईल आणि पर्यावरण संरक्षणात महत्त्वपूर्ण योगदान मिळेल. हरित परिवहन क्षेत्रात झालेल्या या ऐतिहासिक निर्णयामुळे, महाराष्ट्राच्या रस्त्यांवरील प्रदूषण कमी होईल आणि उर्जेचा नव्या तंत्रज्ञानाचा वापर होईल. .

18 views0 comments

Comments


bottom of page