top of page
newsbre.jpg
Writer's pictureYCONE

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी .


मुंबई, :५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आला आहे. या कालावधीत विशेष आशयाचे स्टीकर्स उपलब्ध केले जाणार आहेत. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर ही टोल माफी लागू करण्यात येणार आहे.


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय गुरुवार, ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत लागू होईल. संबंधित शासन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानंतर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत लागू करण्यात येणार आहे.

गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण आहे. संपूर्ण कोकणात गणेशोत्सवाच्या वातावरणात एक खास उत्साह असतो. लाखोंच्या संख्येने मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई आणि पुणे शहरातील कोकणवासीय चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जातात. हे चाकरमानी कुंटुंबासह हा सण साजरा करतात. त्यामुळं त्यांचा विचार करत राज्य सरकारने घेतलेला टोल माफीचा निर्णय अत्यंत महत्वाचा आहे.


गणेशोत्सव २०२४ साठी कोकणात जाणाऱ्या वाहनधारकांना टोल माफीच्या सवलतीसाठी "‘गणेशोत्सव २०२४," कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पथकर माफी पास उपलब्ध करण्यात येणार आहेत. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव असे मजकूर लिहिण्यात येईल. संबंधित स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलिस/पोलिस, आणि प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलिस ठाणे, वाहतूक पोलिस चौक्यां व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावे. हाच पास परतीच्या प्रवासासाठी देखील ग्राह्य धरण्यात येईल.

याशिवाय, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेससाठी ही टोल माफी लागू असणार आहे. ज्या जिल्ह्यातून बसेस येतील त्या जिल्ह्याच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येतील.

पोलीस व परिवहन विभागांनी गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबत नागरिकांना माहिती देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.

अधिक माहिती आणि पास मिळवण्यासाठी संबंधित कार्यालयांशी संपर्क साधावा.

18 views0 comments

コメント


bottom of page