परभणी, 24 ऑगस्ट 2024: केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री श्री शिवराजसिंह चौहान यांनी परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या सोयाबीन पिकाच्या प्रलंबित विम्याची समस्या केंद्रीय मंत्र्यांकडे उचलून धरली होती. यावर तातडीने प्रतिक्रिया देत, श्री चौहान यांनी कृषी व शेतकरी कल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांना या समस्येचा त्वरित निपटारा करण्याचे आदेश दिले होते.
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने 22 ऑगस्ट 2024 रोजी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार समितीची (TAC) बैठक घेतली. या बैठकीत, पीक कापणी प्रयोगांवर विमा कंपनीने केलेला आक्षेप फेटाळण्यात आला आणि विमा कंपनीला परभणी जिल्ह्यातील सुमारे 2,00,000 शेतकऱ्यांचे 200 ते 225 कोटी रुपये प्रलंबित दावे अदा करण्याचे निर्देश देण्यात आले.
आज, 24 ऑगस्ट 2024 रोजी, केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीने संबंधित विमा कंपनीला एक आठवड्याच्या आत देय दाव्याची रक्कम अदा करण्याचे आदेश जारी केले आहेत. या निर्णयामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना महत्त्वाचा लाभ होणार असून, त्यांच्या आर्थिक स्थितीमध्ये सुधारणा होईल, अशी अपेक्षा आहे.
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या या कारवाईमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आणि आशा निर्माण झाली आहे, आणि त्यांनी यासाठी केंद्रीय मंत्री श्री चौहान यांचे आभार मानले आहेत.
Commentaires